पाकचा सीमेवरील गोळीबार थंडावला
By admin | Published: October 11, 2014 12:40 AM2014-10-11T00:40:31+5:302014-10-11T00:40:31+5:30
गेल्या नऊ दिवसांपासून पाककडून होत असलेल्या उखळी तोफांचा व गोळीबाराचा मारा गुरुवारी रात्री मंदावल्याचे दिसले.
जम्मू : गेल्या नऊ दिवसांपासून पाककडून होत असलेल्या उखळी तोफांचा व गोळीबाराचा मारा गुरुवारी रात्री मंदावल्याचे दिसले. जम्मू व सांबा जिल्ह्यात गुरुवारी गोळीबाराची घटना नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय सीमेवर कठुआ जिल्ह्यातील चार भारतीय चौक्यांना पाक अजूनही लक्ष्य बनवित आहे.
भारताच्या इशाऱ्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या लष्कराला सीमेवरील हल्ले थांबविण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ व १० आॅक्टोबरच्या रात्री जम्मू व सांबा जिल्ह्यात कुठेही गोळीबार झाला नाही. (वृत्तसंस्था)
मात्र कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टर भागातील बीएसएफच्या चार चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. (वृत्तसंस्था)