Srinagar Firing: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 12:48 IST2021-10-07T12:48:05+5:302021-10-07T12:48:29+5:30
श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे.

Srinagar Firing: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या!
जम्मू- काश्मीरमध्ये गेला काही दिवसांपासून शांतता नांदलेली पाहायला मिळत असतानाच आज श्रीनगरमध्येदहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती आहे. श्रीनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांमध्ये एक शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांचं नाव सतिंदर कौर असं आहे. तर दीपक चंद नावाच्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. दोघंही अल्लोचोईबाग येथील रहिवासी आहेत. शाळेत घुसून थेट अंदाधुंद गोळीबार करण्यास दहशतवाद्यांनी सुरुवात केली होती.
श्रीनगरमधील एका हायर सेकंडरी शाळेत ही घटना घडली आहे. दोन्ही शिक्षकांवर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात होती अशीही माहिती समोर आली आहे. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन सशस्त्र व्यक्ती शाळेत घुसले आणि त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकाच्या थेट डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी खाली झोपले. त्यानंतर त्या तिघांनीही पळ काढला.