निष्काळजीपणाचा कळस! HIVग्रस्त गर्भवतीवर उपचारास रुग्णालयाचा नकार; नवजात बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:47 PM2022-11-23T13:47:31+5:302022-11-23T13:57:33+5:30

एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट पाहिल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने प्रसूतीला उशीर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

firozabad hospital delayed delivery as pregnant woman was hiv positive | निष्काळजीपणाचा कळस! HIVग्रस्त गर्भवतीवर उपचारास रुग्णालयाचा नकार; नवजात बाळाचा मृत्यू

निष्काळजीपणाचा कळस! HIVग्रस्त गर्भवतीवर उपचारास रुग्णालयाचा नकार; नवजात बाळाचा मृत्यू

googlenewsNext

फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट पाहिल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने प्रसूतीला उशीर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा लगेचच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

महिलेच्या कुटुंबीयांनी सहा तास उपचार झाले नसल्याचा आरोप केला आहे. प्रसूतीला उशीर झाला. त्यानंतर मुलाचा जन्म झाला. मुलाची प्रकृती नाजूक होती आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, कोणीही बोलण्यास तयार नव्हतं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल संगीता अनेजा यांनी मंगळवारी महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. 

वडिलांनी रुग्णालयावर केले गंभीर आरोप 

महिलेचे वडील गीतम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यापूर्वी आपल्या मुलीला एका खासगी रुग्णालयात नेले होते. काही वेळात प्रसूती होईल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुम्हाला 20-25 हजार रुपये लागतील. खर्चामुळे मुलीला सरकारी रुग्णालयात आणले. दुपारी तीन वाजता त्यांनी मुलीला आणले, मात्र रात्री आठ वाजेपर्यंत तिला कोणी हात लावला नाही, औषधही दिले नाही. वेदनेने ती विव्हळत होती. 

रात्री प्रसूती झाली तेव्हा बाळ गंभीर असून त्याला मशीनमध्ये ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सकाळी मुलाचा मृत्यू झाल्याचा फोन आला. एका एनजीओच्या एचआयव्ही विभागाच्या फिल्ड ऑफिसर सरिता म्हणाल्या, मी येथे एचआयव्हीचा रुग्ण पाहिला. महिलेची प्रसूती होणार होती पण ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती, त्यामुळे तिचा रक्तदाब कोणीही तपासला नाही किंवा तिच्यावर उपचारही केले नाहीत. दुपारी तीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ती तशीच पडून होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: firozabad hospital delayed delivery as pregnant woman was hiv positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.