महामार्गावर प्रथमच उतरले वायुदलाचे जेट

By admin | Published: May 21, 2015 11:42 PM2015-05-21T23:42:52+5:302015-05-21T23:42:52+5:30

आपत्कालीन परिस्थितीत विमानांना राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली.

The first air jet to fly on the highway | महामार्गावर प्रथमच उतरले वायुदलाचे जेट

महामार्गावर प्रथमच उतरले वायुदलाचे जेट

Next

नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीत विमानांना राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. वायुदलाच्या मिराज २००० लढाऊ जेट विमानाने गुरुवारी सकाळी मथुरेजवळ ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर इमर्जन्सी लँडिंग करीत हा प्रयोग यशस्वी केला.
वायुदलाचे एखादे विमान राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. सकाळी ६.४० वाजता दिल्ली- आग्ऱ्याच्या मध्यात महामार्गावर हे विमान उतरले. भविष्यात अधिकाधिक महामार्गांवर असे क्षेत्र स्थापन करण्याची योजना असल्याचे वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी विमानाला उतरता यावे यासाठी ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या विमानाने ग्वाल्हेरच्या विमानतळावरून उड्डाण केले होते.

४वायुदलाने अस्थायी वाहतूक नियंत्रक, सुरक्षा सेवा, बचाव वाहने, पक्ष्यांना हुसकावून लावणारे पथक आणि आवश्यक सामुग्रीसह सर्व सज्जता ठेवली होती. आवश्यकता भासल्यास एक हेलिकॉप्टरही सज्ज होते. ही मोहीम आग्रा आणि मथुरा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांच्या समन्वयातून चालविण्यात आली.

आणि विमान रस्त्यावर
४विमान महामार्गावर उतरण्यासाठी अगदी शंभर मीटरपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा उसळी घेत ते वर गेले. त्यानंतर पुन्हा खाली येत जमिनीला घासत रस्त्यावर उतरले.
४आपत्कालीन स्थितीत विमानतळ उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा प्रकारे लँडिंगचा पर्याय निवडला जाऊ शकतो.

Web Title: The first air jet to fly on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.