गुजरातमध्ये पहिले ‘एव्हिएशन पार्क’
By admin | Published: February 9, 2016 03:51 AM2016-02-09T03:51:29+5:302016-02-09T03:51:29+5:30
देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे. राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे. या पार्कमध्ये
अहमदाबाद : देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे. राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे. या पार्कमध्ये धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड, तसेच लघुनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात येतील.
हवाई उड्डयन क्षेत्रातील क्षमतेबाबत विद्यार्थी, उद्योजक, धोरण निर्माते, तसेच व्यवसाय क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकीकृत ‘पार्क’चे निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती ‘गुजसेल’च्या (गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि.) अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी ‘गुजसेल’कडे दिली आहे. हे ‘पार्क’ तयार करण्यासाठी ‘गुजसेल’ने बागडोरा येथील ६० हेक्टर जमीन निर्धारित केली आहे. जगात अशा प्रकारचे केवळ ३ ते ४ ‘एव्हिएशन पार्क’ आहेत.
एकाच छताखाली विविध उपक्रम
‘एव्हिएशन पार्क’मुळे ‘एरोस्पेस’शी संबंधित प्रशिक्षण, संशोधन, निर्मिती आणि उत्पादन एकाच छताखाली होणे शक्य होणार आहे.
सुरुवातीच्या काळात या ‘पार्क’च्या माध्यमातून हवाई क्षेत्राशी संबंधित विविध प्रक्रिया व घडामोडींबाबत माहिती देण्यात येईल. याशिवाय येथे तंत्रज्ञानाने सुसज्जित सभागृह राहणार आहे. ‘एअर शो’, तसेच संंबंधित इतर उपक्रम व साहसी खेळांसाठी येथे जागा राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती चौहान यांनी दिली. (वृत्तसंस्था)