हम है जोश मे.... भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टर दाखल, ड्रॅगन अन् पाकची झोप उडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 03:42 PM2019-02-10T15:42:17+5:302019-02-10T15:42:47+5:30
भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत.
नवी दिल्ली- भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी या विमानांसाठी अमेरिकेबरोबर करार करण्यात आला होता. अखेर भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर 4 चिनूक हेलिकॉप्टर्स पोहोचली आहेत.
सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती. अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात. चिनूकचा वापर करणारा भारत हा 19 वा देश ठरणार आहे.
The first batch of four Chinook helicopters for the Indian Air Force arrived at the Mundra airport in Gujarat. India has procured 15 of these helicopters from the United States. pic.twitter.com/B3voBlZSPk
— ANI (@ANI) February 10, 2019
2018मध्ये बोइंगने भारतीय वायुदलाच्या 4 वैमानिक तसेच 4 फ्लाइट अभियंत्यांना चिनूक हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले होते. अमेरिकन लष्कर जेव्हा युद्धावर असते तेव्हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनूकचा वापर केला जातो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान चॉपर असल्याचे मानले जाते. चिनूक हेलिकॉप्टरची ताकद जगातल्या सर्वच देशांच्या लष्कराला परिचित आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाई करणाऱ्या देशांना गरज पडल्यास चिनूक हेलिकॉप्टरची ताकद दाखवून देता येणार आहे.