पहिल्या दिवशी २५० रूग्ण शस्त्रक्रियेस पात्र हजार जणांची तपासणी: आज विविध भागात मोहीम
By admin | Published: January 2, 2016 08:32 AM2016-01-02T08:32:48+5:302016-01-02T08:32:48+5:30
जळगाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रश्नी बैठक घेऊन नागरिकांना लाभ घेण्याविषयी कार्यकर्त्यांनी आवाहन करावे अशा सूचना केल्या.
Next
ज गाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रश्नी बैठक घेऊन नागरिकांना लाभ घेण्याविषयी कार्यकर्त्यांनी आवाहन करावे अशा सूचना केल्या. ९ ते १२ जानेवारी दरम्यान शहरात महाआरोग्य शिबिर होत आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभाग निहाय आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहिमेस शुक्रवारी प्रारंभ झाला. प्रभाग १ ते ६ मध्ये ही तपासणी झाली. सुमारे एक हजार रूग्णांनी याचा लाभ घेतला. त्यापैकी २५० रुग्ण विविध शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यातील ७० रुग्णांचे एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय आदी तपासण्याही मोफत करण्यात आल्या. पदाधिकार्यांनी दिली भेटशिवाजी नगरातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या आरोग्य तपासणीच्या ठिकाणी २०० रुग्णांची तपासणी झाली. उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे, नगरसेवक कैलास सोनवणे, उत्तम शिंदे, गायत्री शिंदे, भगवान सोनवणे, विशाल वाघ आदींनी तपासणीच्या ठिकाणी भेट देऊन रुग्णांना मदत केली. ----भाजपा कार्यालयात बैठकशहरात होत असलेल्या मोफत महा आरोग्य कुंभाचा नागरिकांना लाभ घ्यावा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. शिबिराविषयी माहितीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. प्राप्त होणार्या आधुनिक रूग्णवाहिका, शववाहिका व अन्य सुविधांची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, मनपा गटनेते डॉ. अश्विन सोनवणे, गोविंद अग्रवाल, दीपक सुर्यवंशी, सुभाष शौचे, बंडू काळे, भगत बालाणी, दिेनेश जोशी व इतर उपस्थित होते. -----