500 आणि 1000 च्या बंदीमुळे पहिला मृत्यू?
By admin | Published: November 9, 2016 07:58 PM2016-11-09T19:58:42+5:302016-11-09T19:58:42+5:30
500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रोजच्या चलनातून बंद करण्याच्या निर्णयानंतर गोंधळ उडणार याचा अंदाज होता. मात्र,या निर्णयामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो याची कोणी कल्पनाही केली नसेल.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रोजच्या चलनातून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या निर्णयानंतर गोंधळ उडणार याचा अंदाज होता. यामुळे ज्या व्यापा-यांचे रोख व्यवहार आहेत त्यांना जास्त त्रास होणार याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, या निर्णयामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो याची कोणी कल्पनाही केली नसेल. मंगळवारी जेव्हा 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याचं वृत्त आलं तेव्हा उत्तर प्रदेशच्या फैजाबादमध्ये एका व्यापाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
या वृत्तानुसार, फैजाबाद येथील डॉक्टर आनंद गुप्ता यांनी सांगितलं की, काल रात्री त्यांना एका रूग्णाचा फोन आला. 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचं वृत्त आल्यापासून अस्वस्थ वाटत असून छातीमध्ये दुखत असल्याचं त्या रूग्णाने सांगितलं. मात्र, तो रूग्ण डॉक्टरांकडे पोहोचण्यापुर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. डॉ. आनंद गुप्ता यांच्यासह अन्य काही डॉक्टरांनीही अनेक जणांचे फोन येत असून त्यांना छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या नुसार, आपल्याकडे असलेल्या रोख रकमेचं आता काय करायचं या चिंतेमुळे लोकांमध्ये भिती पसरली असून हेच या मागे मुख्य कारण आहे .