कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:20 PM2024-03-19T15:20:49+5:302024-03-19T15:21:18+5:30

जम्मू-काश्मीरमधील पाच जागांसाठी पाच टप्प्यात पार पडणार मतदान

First examination after deletion of Article 370; Why is there no courage for assembly elections? | कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

जम्मू-काश्मीर, निवडणूक वार्तापत्र : प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: १८व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जम्मू-काश्मीरमधील पाच जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे, तर लडाखमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 

सन २०१४ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होतील, अशी आशा होती. पण, ती फोल ठरली. दोन्ही निवडणुका एकाच वेळी न घेण्यामागे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सुरक्षेचे कारण दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नाही.

जम्मू-काश्मीर (५) आणि लडाख (१) हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश मिळून लोकसभेच्या ६ जागा आहेत. गतवेळी यातील तीन जागा भाजपने, तर तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या होत्या. येथे भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष, तर मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी व फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पार्टी हे प्रादेशिक पक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला.

प्रचारातील प्रमुख मुद्दा

  • जम्मू-काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. येथे विधानसभाही आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यात आला असून, तेथे विधानसभा नाही. केंद्रशासित प्रदेशामुळे नागरिकांना केंद्राच्या हस्तक्षेपाची भीती वाटते. 
  • लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्याचा दर्जा हा प्रचारातील प्रमुख मुद्दा असणार आहे.


जागावाटपावरून रस्सीखेच

  • जम्मू आणि काश्मीरमध्येदेखील इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मेहबूबा मुफ्तींचा पीडीपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे फारूख अब्दुला पीडीपीला जागा देण्यास तयार नाहीत. 
  • काँग्रेसकडून आघाडी करण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे लडाख, जम्मू आणि उधमपूर हे हिंदूबहुल मतदारसंघ असल्याने भाजपचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे इंडिया आघाडीला एकजुटीशिवाय पर्याय नाही.


जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान

  1. पहिला १९ एप्रिल ———————     उधमपूर
  2. दुसरा २६ एप्रिल —————————-    जम्मू
  3. तिसरा ७ मे —————————     अनंतनाग
  4. चौथा १३ मे -——————————    श्रीनगर
  5. पाचवा २० मे —     बारामुला आणि लडाख
     
  • एकूण मतदार- ८६.९३लाख
  • पुरुष- ४४.३४ लाख
  • महिला- ४२.५८ लाख
  • नवीन मतदार- ३.४लाख
  • एकूण मतदान केंद्रे - ११,६२९


 

    Web Title: First examination after deletion of Article 370; Why is there no courage for assembly elections?

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.