आधी मोफत टॅब दिले, आता परत मागितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:28 AM2023-02-12T06:28:01+5:302023-02-12T06:28:37+5:30
गेल्या वर्षी भाजप-जेजेपी युती सरकारने एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब मोफत दिले होते. सरकार आता ते परत मागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेले मोफत टॅबलेट परत घेण्याचे निर्देश हरियाणा सरकारने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. टॅबलेटसह चार्जर, सिम कार्ड आणि इतर साहित्यही विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जमा करावे लागणार आहे.
गेल्या वर्षी भाजप-जेजेपी युती सरकारने एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब मोफत दिले होते. सरकार आता ते परत मागत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप टॅब परत केले नाहीत, त्यांना परीक्षा क्रमांक देऊ नयेत, अशा सूचनाही दिल्या आहेत. दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना टॅब परत करावा लागणार आहे.