पहिल्या हेलिपोर्टचे दिल्लीत उदघाटन

By Admin | Published: March 1, 2017 04:30 AM2017-03-01T04:30:11+5:302017-03-01T04:30:11+5:30

पहिल्या एकात्मिक हेलिपोर्टचे उद््घाटन झाले. दक्षिण अशियात अशा स्व८पाची सेवा प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे राजू यांनी यावेळी सांगितले.

First heliport inaugurated in Delhi | पहिल्या हेलिपोर्टचे दिल्लीत उदघाटन

पहिल्या हेलिपोर्टचे दिल्लीत उदघाटन

googlenewsNext


नवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्री ए. गजपथी राजू यांच्या हस्ते मंगळवारी येथे देशातील पहिल्या एकात्मिक हेलिपोर्टचे उद््घाटन झाले. दक्षिण अशियात अशा स्व८पाची सेवा प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे राजू यांनी यावेळी सांगितले.
या हेलिपोर्टची निर्मिती सरकारी मालकीच्या पवन हंस लिमिटेडने केली आहे. हेलिपोर्टवर १५० प्रवासी क्षमतेची टर्मिनल इमारत, १६ हेलिकॉप्टर्सची पार्किंग करता येईल, असे चार हँगर्स आणि नऊ पार्किंग बेज आहेत. कार व इतर मोठी वाहने उभी करण्यासाठी नऊ पार्किंग जागाही येथे आहेत, असे राजू म्हणाले. उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात हे हेलिपोर्ट आहे.
या हेलिपोर्टवर पवनहंसकडील तसेच इतरही हेलिकॉप्टर्सची देखभाल, दुरुस्ती आणि पूर्ण तपासणी करण्याची सोय आहे. देशात आजही हेलिकॉप्टर आणि जहाजातून माल वाहतूक अतिशय कमी प्रमाणात आहे. आम्ही जर त्याचे प्रमाण वाढवले तर त्यासाठी कौशल्य विकासाची गरज आहे, असे राजू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: First heliport inaugurated in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.