स्मृती इराणींना नाकारण्यात आली होती पहिली नोकरी

By admin | Published: August 25, 2016 11:04 AM2016-08-25T11:04:16+5:302016-08-25T11:04:16+5:30

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जेट एअरवजेच्या केबीन क्रू पदाकरिता अर्ज केला होता, मात्र व्यक्तिमत्व खास नाही सांगत नोकरी नाकारण्यात आली होती

The first job that was rejected by Irani Irani | स्मृती इराणींना नाकारण्यात आली होती पहिली नोकरी

स्मृती इराणींना नाकारण्यात आली होती पहिली नोकरी

Next
- ऑनलाइनल लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा अभिनेत्रीपासून ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. पण स्मृती इराणी यांनादेखील सुरुवातीच्या दिवसांमध्ये अपयश पाहावे लागले होते. स्वत: स्मृती इराणी यांनी सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना आपल्याला नाकारण्यात आलेल्या नोकरीचा किस्सा सांगितला आहे. स्मृती इराणी यांना जेट एअरवेजमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अर्जदेखील केला होता, मात्र तुमचं व्यक्तिमत्व खास नसल्याचं सांगत त्यांना नोकरी नाकारण्यात आली होती.
 
एअर पॅसेंजर असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना स्मृती इराणी यांनी ही आठवण सांगितली. 'मिश्किल अंदाजात बोलताना स्मृती इराणी यांनी नोकरी नाकारल्याबद्दल जेट एअरवेजचे आभार मानले. जेट एअरवेजने नोकरी नाकारल्यानंतर मी मॅकडोनल्डमध्ये नोकरी केली आणि त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे', असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
 
'अनेक लोकांना माझी पहिली कोणती नोकरी करण्याची इच्छा होती याची माहिती नाही. मी जेट एअरवजेच्या केबीन क्रू पदाकरिता अर्ज केला होता. पण तुमचं व्यक्तिमत्व खास नाही सांगत नोकरी नाकारण्यात आली होती', असं स्मृती इराणींनी सांगितलं आहे. अर्ज बाद केल्याबद्दल स्मृती इराणींनी यावेळी जेट एअरवेजचे आभारही मानले.
 

Web Title: The first job that was rejected by Irani Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.