आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:40 PM2024-05-28T16:40:56+5:302024-05-28T16:43:21+5:30

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पीएम मोदी कन्याकुमारीला ध्यान करण्यासाठी जाणार आहेत.

First Kedarnath, now Kanyakumari; PM Modi will meditate at Vivekananda Memorial Rock | आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी

आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी

Narendra Modi Lok Sabha Election : येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या 57 जागांसाठी  मतदान होत आहे. तर, 30 मे रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. दरम्यान, प्रचार थांबल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदीतामिळनाडूचा दौरा करणार आहेत. केदारनाथप्रमाणे यंदा ते कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी 31 मे रोजी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देतील आणि दिवसभर येथे ध्यानस्त होतील. त्यापूर्वी ते गुरुवारी(30 मे) पंजाबमध्ये रॅलीही घेणार आहेत. पंजाबमधील निवडणूक रॅलीनंतर ते तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार असून, तिथे त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम असेल. मात्र, अद्याप पक्षाकडून 31 मे आणि 1 जूनचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

2019 मध्ये केदारनाथमध्ये ध्यान केले
यापूर्वी 2019 च्या निवडणुकीदरम्यान शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबल्यानंतर पीएम मोदींनी थेट उत्तराखंडमधील केदारनाथ गाठले होते. तिथे रुद्र गुहेत मोदींनी बराचवेळ धान्य केले. त्यांचे धानस्त अवस्थेतील फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आता यावेळी पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जाणार आहेत. 

या जागांसाठी 1 जून रोजी मतदान 
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत. 

Web Title: First Kedarnath, now Kanyakumari; PM Modi will meditate at Vivekananda Memorial Rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.