देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट; एम्सच्या डॉक्टरांची कमाल, सात वर्षांच्या मुलाला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:17 AM2024-07-15T10:17:41+5:302024-07-15T10:18:01+5:30

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि मुलाचे वजन फक्त २१ किलो होते. धमनीमधील विकार किडनीच्या अगदी जवळ होता ही अडचण होती.

First kidney transplant in the country; AIIMS Doctor's treatment on A seven-year-old boy | देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट; एम्सच्या डॉक्टरांची कमाल, सात वर्षांच्या मुलाला जीवदान

देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट; एम्सच्या डॉक्टरांची कमाल, सात वर्षांच्या मुलाला जीवदान

नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी रेनोव्हास्कुलर हायपरटेन्शन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या सात वर्षांच्या मुलावर यशस्वी ऑटोट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली आहे. तब्बल आठ तास चाललेल्या या कठीण शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी बाळाची खराब झालेली एक किडनी पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित केली. देशातील ही पहिली तर जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. २९ जून रोजी शस्त्रक्रियेनंतर मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो पूर्णपणे निरोगी आहे.

किडनी वेगळी करणे हे एक मोठे आव्हान...

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि मुलाचे वजन फक्त २१ किलो होते. धमनीमधील विकार किडनीच्या अगदी जवळ होता ही अडचण होती.

त्यामुळे किडनी सुरक्षितपणे नसांपासून वेगळे करणे हे मोठे आव्हान होते. चुकून मोठी नस कापली तरी २०-३० सेकंदात एक ते दीड लिटर रक्तस्त्राव झाला असता. खराब झालेली रक्तवाहिनी अत्यंत काळजीपूर्वक काढली गेली.

डॉक्टरांकडे होते दोन पर्याय...

गेल्या तीन वर्षांत तीनदा रक्तस्राव झाल्यानंतर पालकांनी प्रणिलला दोन खासगी रुग्णालयात नेले, तिथे त्यांनी मुलाची किडनी काढण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी मुलाला एम्सच्या सीटीबीएस विभागात नेले. डॉक्टरांकडे उपचाराचे दोन पर्याय होते. पहिली स्टेंट आणि दुसरी शस्त्रक्रिया. स्टेंट लावणे शक्य नसल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला.

धमनी फुग्यासारखी फुगली,  ब्रेन स्ट्रोकचा होता धोका

एम्सच्या जनरल सर्जरी विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. मंजुनाथ पोळ यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील सात वर्षीय प्रणिल चौधरीच्या उजव्या किडनीच्या धमनीमध्ये धमनीविकार होता, त्यामुळे ही धमनी फुग्यासारखी फुगली होती आणि कधीही फुटू शकली असती. हे मुलासाठी अतिशय घातक होते.

डॉक्टरांनी इशारा दिला की, हा विकार शरीराच्या इतर भागांवर परिणाम करू शकतो. यामुळे ब्रेन स्ट्रोक देखील येण्याची शक्यता आहे. काही मुलांमध्ये हा आजार जन्मजात असतो, तर काही मुलांमध्ये हा आजार वयाच्या पाच, सात किंवा १३ व्या वर्षी दिसून येतो. या आजारात रक्ताभिसरण प्रभावित होते, त्यामुळे रक्तदाब वाढतो.

Web Title: First kidney transplant in the country; AIIMS Doctor's treatment on A seven-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.