पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था द्वारकेमध्ये, मोदी यांची घोषणा; देवदर्शनानंतर गुजरात दौ-याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:28 AM2017-10-08T02:28:58+5:302017-10-08T02:29:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील पहिल्या सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा द्वारका येथे केली. मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौºयावर आहेत. सकाळी त्यांनी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले.
द्वारका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील पहिल्या सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा द्वारका येथे केली. मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौºयावर आहेत. सकाळी त्यांनी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले.
एका महिन्याच्या काळातील हा त्यांचा तिसरा गुजरात दौरा आहे. तिथे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह पंतप्रधानांचेही गुजरात दौरे वाढले आहेत.
द्वारकेमध्ये जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील ही पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था आहे. मोडकजवळ याची स्थापना करण्यात येणार आहे. समुद्रकिनाºयांच्या सुरक्षेसाठी आम्ही आम्ही सागरी पोलिसांच्या आधुनिकीकरणावर भर देत आहोत. ज्याप्रमाणे हवाई दलाच्या पायलटना जामनगर येथे प्रशिक्षित केले जाते, त्याप्रमाणे सागरी पोलिसांना येथे प्रशिक्षित करण्यात येईल.
पंतप्रधानांनी द्वारका-ओखा यांना जोडणाºया पुलाचे भूमिपूजन केले. या पुलाचा अंदाजित खर्च ९६२ कोटी रुपये आहे. त्यावरील सोलर पॅनलद्वारे १ मेगावॅट वीज मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ५,८२५ कोटी रुपये खर्चाच्या चार राज्यमार्ग योजनांचे भूमिपूजन केले. मोदी म्हणाले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या भागाचा विकास आपल्याला करावा लागेल. आज आपण ज्या पुलाचे भूमिपूजन केले आहे, तो पूल फक्त द्वारकेला नव्हे, तर इतिहास आणि संस्कृतीला जोडणारा ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
दिवाळी लवकर सुरू
जीएसटीसंदर्भात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जीएसटीबाबतच्या नव्या निर्णयांमुळे नागरिकांची दिवाळी लवकरच सुरू झाली आहे. जीएसटीसंदर्भातील काही बाबींना गुजरातमधील कपडा व्यापाºयांनी जोरदार विरोध दर्शविला होता.
विकासाची परिभाषा बदलली : मोदी
चोटिला (राजकोट) : विकासाच्या मुद्द्यांवरून काँग्रेससह काही विरोधी पक्षांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पूर्वी एखाद्या भागात हातपंप बसविण्याला विकास म्हणत होते. मात्र, आम्ही विकासाची परिभाषाच पूर्णपणे बदलून टाकली आहे.
पूर्वी एखादा राजकीय नेता
एकाच हातपंपाच्या जिवावर आपणास पुन्हा-पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करत असे. आम्ही नर्मदेचे पाणी पाइपलाइनने येथे आणले आहे. त्यामुळे या भागाचे नंदनवन होत आहे.