पहिल्या मेडिपार्कला चेन्नईजवळ जमीन
By admin | Published: October 6, 2016 05:44 AM2016-10-06T05:44:14+5:302016-10-06T05:44:38+5:30
देशात प्रथमच अत्यंत प्रगत व महाग वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन परवडणाऱ्या खर्चात कपात होणार असून त्यासाठी चेन्नईतील ३३०.१० एकर जमिनीवर मेडिपार्क उभारण्यात येणार आहे
नवी दिल्ली : देशात प्रथमच अत्यंत प्रगत व महाग वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन परवडणाऱ्या खर्चात कपात होणार असून त्यासाठी चेन्नईतील ३३०.१० एकर जमिनीवर मेडिपार्क उभारण्यात येणार आहे. अत्यंत प्रगत व महाग अशी वैद्यकीय उपकरणे व साधनांचे स्थानिक पातळीवर उत्पादन वाढावे, यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील एचएलएल लाईफकेअर उपक्रमाला चेन्नईतील ३३०.१० एकर जमीन भाड्याने देण्यास संमती दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने एचएलल लाईफकेअरने या कामासाठी ३३०.१० एकर जमीन भाड्याने मेडिपार्कला द्यावी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ही जमीन चेन्नईजवळ चेंगलपट्टू येथे असून एचएलएलचा या प्रकल्पात ५० टक्के भाग असेल.
देशात वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात प्रथमच उत्पादन प्रकल्प सुरू होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत
प्रगत उपकरणे व साधने कमी
खर्चात स्थानिक पातळीवर उत्पादित व्हावीत व पर्यायाने मोठ्या संख्येतील रुग्णांना ती परवडणाऱ्या खर्चात मिळावीत हा त्यामागे उद्देश असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)