जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:35 PM2023-12-09T19:35:31+5:302023-12-09T19:40:32+5:30

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिराचा गाभारा कसा असेल, याचा अंदाज येईल, असे काही फोटो शेअर करण्यात आले आहे.

first photo of the inside of shri ram mandir at ayodhya has come out | जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ४ हजारहून अधिक संत-महंत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तसेच वेगाने तयारी सुरू आहे. मात्र, श्रीराम मंदिराचे गर्भगृह कसे असेल, याचा अंदाज येईल, असे काही फोटो शेअर करण्यात आला आहे. 

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याची एक झलक असल्याचे चंपत राय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भगवान श्री रामलला यांचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. नुकतेच लाइटिंग-फिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. याचे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे, असे चंपत राय यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

३१ डिसेंबरपर्यंत पहिल्या मजल्यापर्यंतचे काम होणार!

१५ डिसेंबरपर्यंत रामललाची मूर्ती घडवून पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तळमजला तसेच पहिल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. दिलेल्या डेडलाइननुसार काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या मान्यवरांनी काही दिवस आधीच अयोध्येत यावे, जेणेकरून गैरसोय होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचे आणखी फोटो पाहण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, राम मंदिराच्या दर्शनाबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या १० ते १५ हजार लोकांना रात्री मुक्काम करायचा असेल तर त्यांना निवारा कुठे मिळेल? त्यांना अन्न-पाणी कोठून मिळणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यासाठी ट्रस्ट नवीन टीनशेड सिटी उभारत आहे. हे काम फेब्रुवारीच्या अखेरीस तयार होईल. या कामासाठी देशभरातून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवी कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात येत आहे. प्रत्येकजण आपापले कर्तव्य बजावत आहे, अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे. 
 

Web Title: first photo of the inside of shri ram mandir at ayodhya has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.