दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:02 AM2019-10-07T05:02:25+5:302019-10-07T05:02:46+5:30

मंगळवारी पहिले ‘राफेल’ विमान औपचारिकपणे दिले जाणार असले, तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात यायला मे महिना उजाडेल.

 The first 'Rafael' aircraft to arrive at the helm of Dussehra | दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील सामरिक क्षमतेची समीकरणे बदलून भारताचे पारडे जड करणारे पहिले ‘राफेल’ विमान स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: फ्रान्सला जाणार असून, त्यानंतर ते तेथे भारतीय परंपरेनुसार शस्त्रपूजनही करणार आहेत.

फ्रान्सकडून घ्यायच्या एकूण ३६ ‘राफेल’ विमानांपैकी पहिले विमान भारताकडे सुपुर्द करण्यासाठी येत्या मंगळवारचा दसरा आणि भारतीय हवाईदलाचा ८७वा वर्धापन दिन असा दुहेरी मुहूर्त निवडण्यात आला आहे. त्यानिमित्त राजनाथ सिंग सोमवारपासून तीन दिवस फ्रान्सच्या दौºयावर जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग गेली अनेक वर्षे दसºयाच्या दिवशी न चुकता शस्त्रपूजन करण्याची परंपरा पाळत आले आहेत. गेल्या सरकारमध्ये गृहमंत्री असतानाही त्यांनी असे शस्त्रपूजन केले होते. तीच परंपरा कायम ठेवून पहिले ‘राफेल’ स्वीकारल्यानंतर यंदाचे शस्त्रपूजन ते फ्रान्समध्ये करतील.

पहिले ‘राफेल’ भारताकडे सुपुर्द करण्याचा औपचारिक समारंभ पॅरिसपासून सुमारे ५९० किमी अंतरावर असलेल्या बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात असलेल्या दस्साँ एव्हिएशन कंपनीच्या कारखान्यात होणार आहे. हा समारंभ झाल्यानंतर तेथेच राजनाथ सिंग शस्त्रपूजन करतील व नंतर ‘राफेल’ विमानातून एक फेरफटकाही मारतील, असे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले. फ्रान्सच्या सशस्त्र सैन्यदलांच्या मंत्री फ्लॉरेन्स पार्ले याही यावेळ आवर्जून उपस्थित असतील.

मंगळवारी पहिले ‘राफेल’ विमान औपचारिकपणे दिले जाणार असले, तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात यायला मे महिना उजाडेल. पुढील दोन वर्षांत सर्व विमाने मिळाल्यानंतर, त्यांच्या दोन स्वतंत्र स्वाड्रन स्थापन करून त्या पंजाबमध्ये अंबाला तर प. बंगालमधील हाशिमारा येथे तैनात केल्या जातील.

‘मिटिआॅर’, ‘स्कॅल्प’मुळे शत्रूला भरेल धडकी 
‘राफेल’ लढाऊ विमाने ‘मिटिआॅर’ आणि ‘स्कॅल्प’ या त्यांच्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील. त्यामुळे भारतीय हवाई दलास त्यामुळे शत्रूला धडकी भरेल अशी न भूतो मारकशक्ती प्राप्त होणार आहे.

Web Title:  The first 'Rafael' aircraft to arrive at the helm of Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.