पहिल्याच पावसात आठ बंधारे तुडुंब जलयुक्तशिवार योजना : नशिराबाद परिसरात जलपातळीत वाढ
By admin | Published: June 30, 2016 06:54 PM2016-06-30T18:54:01+5:302016-06-30T18:54:01+5:30
नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Next
न िराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या एकत्रित प्रयत्नातून नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटीची कामे पूर्णत्वास आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत वाकीनदीवर वेगवेगळ्या ठिकाणी सहा तर हातेड नाल्यावर दोन ठिकाणी असे एकूण आठ साठवण बंधारे बांधण्यात आले आहे. हे सर्वच बंधारे पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणखी तीन बंधारे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.याठिकाणी झाले बंधारेजलयुक्त शिवार योजने अंतर्गत पी.टी.पाटील यांच्या मळ्याजवळ १६ लाख रुपयांचा, प्रसाद पाटील यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचा, सुरेश गिरधर रोटे, सुरेश रामकृष्ण रोटे, मधुकर चौबे यांच्या शेताजवळ प्रत्येकी १४ लाख रुपयांचा, पांडुरंग पाटील, बाबुराव माधव पाटील यांच्या मळ्याजवळ प्रत्येकी १३ लाख तर बाबुराव येवले यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचे बंधारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे.शेतकर्यांना वरदानजलयुक्त शिवार बंधार्यामुळे परिसरातील सुमारे दोनशे विहिरींच्या जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सर्व बंधारे नशिराबाद परिसरातील शेतकर्यांसाठी वरदानच ठरले आहे.दरम्यान नशिराबादच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी इतकी बंधारे बांधण्यात आली आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे फलदायी ठरणारे आहे.आणखी सुमारे १ कोटीची कामे प्रस्तावितनशिराबाद परिसरातील या प्रकल्पांतर्गत सुमारे १ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. सन १९८५ मध्ये बांधण्यात आलेला आतापर्यंत दुर्लक्षित झालेला उबंरझिरा ठिकाणच्या फुटलेल्या पाझर तलावाचे पुनरुर्जीवित करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.बंधारा कामाच्या पूर्णत्वासाठी माजी खासदार वाय.जी.महाजन, भाजपचे शहराध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती कमलाकर रोटे, राजेंद्र पाचपांडे, योगेश पाटील, विनोद पाटील, सचिन महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.