बलात्कारातील पहिला आरोपी 2 मार्च रोजी फासावर लटकणार, जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:58 PM2019-02-04T15:58:05+5:302019-02-04T16:06:27+5:30

महेंद्रसिंग गोंड असे दोषीचे नाव असून गतवर्षी 30 जुन रोजी त्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता.

First rapist to be hanged till death under child rape law on March 2 | बलात्कारातील पहिला आरोपी 2 मार्च रोजी फासावर लटकणार, जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

बलात्कारातील पहिला आरोपी 2 मार्च रोजी फासावर लटकणार, जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

Next

भोपाळ - मध्य प्रदेशमधील जिल्हा सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आपल्या शाळेतील 4 वर्षीय विद्यार्थीनीवर या शिक्षकाने बलात्कार केला होता. याप्रकरणी सतना न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असून 2 मार्च रोजी फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी फाशी देण्याचा कायदा संमत झाल्यानंतर, फाशी देण्यात येणारा हा पहिलाच निकाल आहे. 

महेंद्रसिंग गोंड असे दोषीचे नाव असून गतवर्षी 30 जुन रोजी त्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर काही तासातच गोंड यास अटक करण्यात आली होती. गोंड याने बलात्कारानंतर या चिमुकलीस मृत झाल्याचे समजून एका जंगलात फेकून दिले होते. मात्र, सुदैवाने मुलीच्या कुटुंबीयांना ती जंगलात जिवंत सापडली. त्यामुळे, कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. पण, या चिमुकलीची प्रकृती अत्यंत नाजूक होती. तसेच तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात इजा झालेली होती. त्यामुळे सरकारने तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

नागोड येथील सत्र न्यायालयाने गोंड यास 19 सप्टेंबर 2018 रोजी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण मानत 25 जानेवारी रोजी आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा ठोठवली. तसेच आरोपी शिक्षकासाठी मृत्युदंडाचीच शिक्षा उचित असल्याच मतही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, याप्रकरणी सतना जिल्हा न्यायालयाकडून आम्हाला ई-मेल मिळाला आहे. त्यामध्ये, गोंड यास 2 मार्च रोजी पहाटे 5.00 वाजता फासावर लटकविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींकडून या फाशीला स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याचेही जबलपूर सेंट्रल जेलचे जेलर गोपाल तमराकर यांनी म्हटल आहे. 
 

Web Title: First rapist to be hanged till death under child rape law on March 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.