देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:46 IST2018-01-25T00:46:31+5:302018-01-25T00:46:48+5:30
येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे
गंगटोक : येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच
मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
अन्य राज्यांतून रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या येऊ न देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. केवळ सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे भाज्या आणि फळेच उपलब्ध असणारे सिक्कीम हे त्यामुळे भारतातील पहिले राज्य असेल.
सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आणि फळे बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार वाहने उपलब्ध करून देणार आहे. यामुळे सिक्कीम कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनले, असे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी म्हटले आहे.
राज्यात रासायनिक शेती करणाºया सुमारे ६६ हजार शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व पटवून देणे, सरकारला जड गेले नाही. चामलिंग २००३मध्ये चामलिंग मुख्यमंत्री होते व त्यांनी विधानसभेत राज्यातील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याची घोषणा केली होती. ते तेव्हा म्हणाले होते की आले, हळद, आॅर्किड, वेलची आणि बकव्हिट (एका प्रकारचे धान्य) ही पाच उत्पादने सेंद्रिय पद्धतीने करण्याचे लक्ष्य आहे व त्यानंतर इतर पिके घेतली जातील.
९९ टक्के सेंद्रिय शेती
त्यांनी २०१०मध्ये सिक्कीम आॅर्गनिक मिशनची स्थापना करून प्रारंभिक प्रकल्पात ८,१५० हेक्टर्स सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. आज राज्यातील लागवडयोग्य ७७ हजार हेक्टर्सपैकी ९९ टक्के शेती सेंद्रिय व्यवस्थापनाखाली आहे. १५ वर्षांपूर्वी सिक्कीम पूर्णपणे सेंद्रिय शेतीचे राज्य करण्याची विधानसभेत केलेली घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीच २००३मध्ये ही घोषणा केली होती.