पहिलीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांची वाजत गाजत मिरवणूक--- जोड

By admin | Published: June 15, 2015 09:29 PM2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

पाठ्यपुस्तक दिनानिमित्त तालुक्यातील इयत्ता १ ली, ८ वी च्या २० हजार ८९० मुले व १७ हजार ५९० मुली तसेच इयत्ता ९ वी व १० वीच्या ४ हजार ९०२ मुले व ३ हजार ६८४ मुली, उच्च माध्यमिक ४ हजार ५ मुले व २ हजार ५४९ मुली अशा एकूण २९ हजार ७९७ मुले व २३ हजार ८२३ मुली अशा एकूण ५३ हजार ६२० विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या २ लाख ८३ हजार ८४३ पुस्तकांपैकी बहुसंख्य पुस्तकांचे आज पहिल्या दिवशी सोमवारी वाटप करण्यात आल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान उपक्रमाचे विषयतज्ज्ञ हनुमंत माने यांनी दिली.

The first of the tigers who have entered the first procession --- Joint | पहिलीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांची वाजत गाजत मिरवणूक--- जोड

पहिलीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांची वाजत गाजत मिरवणूक--- जोड

Next
ंड : दौंड शहर व तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य, पुष्पगुच्छ, खाऊ यासह जेवण देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

*मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
दौंड येथील नवयुग प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ हिंगणे व गॅरेला विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भुजबळ यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप मांडे, शांताबाई चव्हाण, मनीषा सोनवणे, मनीषा गायकवाड, भागीरथी कोळी व पालकवर्ग उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हारी राहिंज, संतोष गवळी, सविता काकडे आणि शिक्षकवर्ग यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खंडागळे, सचिन यादव यांनी केले तर आभार सचिन यादव यांनी मानले.

*गुलाबपुष्प देऊन सत्कार
येथील शिशुविकास मंदिरात विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गुलाबपुष्प व खाऊवाटप करून स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी शाळेच्या प्रांगणात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्याम वाघमारे, सचिव ए. एस. मुळे, के. आर. गावडे, मीनाक्षी शेलार, सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जालम यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक ढाकाळकर यांनी मानले.

नवागतांचे उत्साहात स्वागत
नवयुग शिक्षण संस्थेच्या स्व. आसुदामल नारंग प्राथमिक शाळेत सर्व शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले तसेच नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी छगनराव बनसोडे, संजय चितारे, रामभाऊ ठाणेदार, जुबेर सय्यद, रमजान खान यांसह अनेक पालक व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापिका आर. एस. निडोणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार एस. के. चव्हाण यांनी मानले.

गोड जेवणाने शाळेचा पहिला दिवस साजरा
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवसाची सुरुवात नवीन विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुष्प देऊन करण्यात आली. त्यामुळे शाळेचा पहिलाच दिवस मुलांसाठी कुतूहलाचा ठरला .
शिक्षणाच्या नवीन वर्षाचे स्वागत करताना या वर्षी पाठ्यपुस्तके, गणवेशवाटप करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या खाऊवाटपाचा कार्यक्रम पार पडला.
पांढरेवाडी येथे उपसरपंच हनुमंत चव्हाण, अनिल झगडे, आनंद निंबाळकर, खंडू भागवत, तृप्ती निंबाळकर, पोलीस पाटील विलास येचकर, राहुल शितोळे, शफिक मनियार, रूपाली नावडकर, मंजिरी बिडवे, रवींद्र्र कुंभार, सुषमा घोडके, पालकवर्ग, सर्व विद्यार्थी, शिक्षक, समता परिषदेचे विजय गिरमे उपस्थित होते.
कुरकुंभ येथे सरपंच जयश्री भागवत, बाळासाहेब खंडाळे, आशा भागवत, मुख्याध्यापिका अलका तेरे, गटसमन्वयक दिलीप वणवे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शांताराम जगताप, सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे उपस्थित होते.
पांढरेवाडी येथे प्रथमच सातवीचा सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे प्रथमच इंग्रजी माध्यमातील मुलांचे पालक मुलांना परत प्राथमिक शाळेत टाकत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे साहजिकच मराठी शाळेमधील विद्यार्थिसंख्या वाढत आहे.
शासनामार्फत घेतल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञा परीक्षा व अन्य परीक्षेत तसेच जिल्हा परिषदेमार्फत विविध खेळांमध्ये प्राथमिक शाळांचा प्रभाव पाहता येथे शिकत असणारे विद्यार्थी विविध क्षेत्रांत चमकत आहेत.

* गुलाबपुष्प देऊन स्वागत
देऊळगावराजे : येथील सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, उपाध्यक्ष आनंदराव गिरमकर, सचिव हरिभाऊ ठोंबरे, खजिनदार संदीप नय्यर, प्राचार्य आदिनाथ थोरात यांच्या हस्ते गुलाबपुष्पांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

* विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण गरजेचे : अर्चना आखाडे
पाटेठाण : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणे, ही काळाची गरज बनली असल्याचे मत ठाणे जिल्हा कृषी अधिकारी अर्चना आखाडे यांनी व्यक्त केले.
खामगाव (ता. दौंड) येथील गाडमोडी चौकातील आनंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बर्वे होते. या प्रसंगी बोलताना आखाडे पुढे म्हणाल्या की, ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात आले आहे. यातूनच शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते मुलांना गुलाबपुष्प देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. मुलांना शाळेत सोडवायला आलेल्या पालकांनीदेखील या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या भारती पोमण, सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांच्यासह परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : पाटेठाण (ता. दौंड) येथील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

14062015-िं४ल्लि-06
-------------------

Web Title: The first of the tigers who have entered the first procession --- Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.