भाजपाचे प्रथमच सर्वाधिक आमदार

By Admin | Published: December 28, 2014 02:17 AM2014-12-28T02:17:46+5:302014-12-28T02:17:46+5:30

गेल्या काही महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील मोठ्या यशानंतर इतिहासात प्रथमच देशभरातील आमदारांच्या संख्येत भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला मागे टाकले आहे.

For the first time BJP's largest legislator | भाजपाचे प्रथमच सर्वाधिक आमदार

भाजपाचे प्रथमच सर्वाधिक आमदार

googlenewsNext

ऐतिहासिक विक्रम : ४,१२० पैकी १,०५८ विधानसभा सदस्य; काँग्रेस ८ तर भाजपा ९ राज्यांत सत्तेवर
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील मोठ्या यशानंतर इतिहासात प्रथमच देशभरातील आमदारांच्या संख्येत भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला मागे टाकले आहे. याचबरोबर आमदारांच्या संख्येच्या दृष्टीने काँग्रेसने गेल्या ६३ वर्षांतील नीचांक गाठला असून निर्वाचित लोकप्रतिनिधींची संख्या आणि जनाधाराची व्याप्ती या दोन्ही बाबतीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनला आहे.
लोकसभा निवडणुकीतील ‘न भूतो...’ यशाच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्येही बाजी मारल्याने, १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीसाठी (आणि अर्थात त्यात पूर्वाश्रमीचा जनसंघही आला) २०१४ हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. काही निवडक राज्यांपुरता मर्यादित राहिलेला भाजपा आता सर्वाधिक भौगोलिक व्याप्ती असलेला राष्ट्रीय पक्ष झाला आहे.
देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील आमदारांची संख्या ४,१२० आहे. ताज्या आकडेवारीनुसार यापैकी १,०५८ आमदार भाजपाचे आहेत व ९४९ काँग्रेसचे आहेत. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ही आकडेवारी ऐतिहासिक आहे.
कारण देशातील एकूण आमदारांच्या संख्येत भाजपाने काँग्रेसला प्रथमच मागे टाकले आहे, तर काँग्रेसचा गेल्या ६३ वर्षांतील हा नीचांक आहे. याआधी ‘जनता लाटे’नंतर १९७७ व १९७९ मधील विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या आमदारांची देशव्यापी संख्या एक हजाराच्या खाली गेली होती; पण ती आजच्या ९४९ एवढी कधीच कमी झाली नव्हती.
भौैगोलिक व्याप्तीच्या दृष्टीनेही भाजपाच्या कमळाचा ठसा आज देशाच्या सर्वाधिक भागावर उमटलेला दिसत आहे. उत्तर भारतात भाजपाचे प्राबल्य निर्माण झाले आहे.
पश्चिम भारतात भाजपाचे प्राबल्य काँग्रेसहून दुप्पट आहे, तर पूर्व भारतात दोघे तुल्यबळ आहेत, असे चित्र दिसते. नाही म्हणायला ईशान्य भारतात काँग्रेस अजूनही पाय रोवून आहे. पण दक्षिणेत मात्र प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत भाजपा व काँग्रेस असे दोघेही दुर्बळ दिसतात.
महाराष्ट्रासारख्या राज्यात १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर ताज्या निवडणुकांमध्ये तिसऱ्या स्थानावर जाणे, ही काँग्रेसच्या दृष्टीने अधिक चिंतेची बाब आहे. सध्या काँग्रेस कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व ईशान्येकडील राज्यांमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून असल्याचे दिसते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

संपूर्ण देशाचा विचार केला तर केंद्रातील सत्तेखेरीज भाजपाची नऊ राज्यांमध्ये सत्ता आहे, तर काँग्रेस आठ राज्यांमध्ये सत्तेवर आहे.
प. बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, नागालँड आणि बिहार या राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा यांच्याखेरीज अन्य पक्षांची सरकारे आहेत.

वर्ष काँग्रेस भाजपा
१९६९ १,६२५ २११
१९७५ २,१८८ १८९
१९८४ २,०१३२२४
१९९९ १,२८० ७०७
२००४ १,१२९ ९०९
२०१४ ९४९ १,०५८

Web Title: For the first time BJP's largest legislator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.