देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त; नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:21 AM2021-11-25T08:21:19+5:302021-11-25T08:21:28+5:30

1990 च्या दशकात प्रत्येक 1000 पुरुषांमागे केवळ 927 महिला होत्या. 2015-16 मध्ये हा आकडा 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 वर आला. पण आता पहिल्यांदाच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे.

For the first time in the country, women outnumber men; Revealed in the National Family and Health Survey | देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त; नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेमध्ये खुलासा

देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त; नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेमध्ये खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली: नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे (NFHS) नुसार देशात आता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आता 1000 पुरुषांमागे 1020 महिला आहेत. प्रजनन दरात घट झाल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. 

या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झालं की, आता भारतात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी परिस्थिती काहीशी वेगळी होती, 1990 मध्ये दर 1000 पुरुषांमागे फक्त 927 महिला होत्या. 2005-06 मध्ये झालेल्या तिसऱ्या NHFS सर्वेक्षणात 1000-1000 ची बरोबरी झाली. त्यानंतर 2015-16 मध्ये चौथ्या सर्वेक्षणात ही आकडेवारी पुन्हा घसरली. 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. पण आता पहिल्यांदाच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे.

स्वतःचे बँक खाते असलेल्या महिलांच्या संख्येत 25% वाढ

78.6% महिला त्यांचे बँक खाते चालवतात. 2015-16 मध्ये हा आकडा केवळ 53% होता. त्याच वेळी 43.3% महिलांच्या नावावर काही मालमत्ता आहे, तर 2015-16 मध्ये हा आकडा केवळ 38.4% होता. मासिक पाळीच्या काळात सुरक्षित स्वच्छता उपायांचा अवलंब करणाऱ्या महिलांचे प्रमाण 57.6% वरुन 77.3% पर्यंत वाढले आहे. तर, लहान मुले आणि महिलांमध्ये अशक्तपणा हा एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. 15 ते 49 वयोगटातील 67.1% मुले आणि 57% स्त्रिया अशक्तपणाने ग्रस्त आहेत.

30% लोकसंख्येकडे स्वतःचे आधुनिक शौचालय नाही

2015-16 मध्ये स्वतःची आधुनिक शौचालये असलेली कुटुंबे 48.5% होती. 2019-21 मध्ये ही संख्या 70.2% वर गेली आहे. मात्र 30 टक्के अजूनही वंचित आहेत. देशातील 96.8% घरांमध्ये वीज पोहोचली आहे. तर 2005-06 मध्ये आयोजित केलेल्या NFHS-3 नुसार हे प्रमाण समान होते. 

डेटा स्केल

देशात प्रथमच प्रजनन दर 2 वर आला आहे. 2015-16 मध्ये हा 2.2 होता. विशेष बाब म्हणजे प्रजनन दर 2.1 हा रिप्लेसमेंट मार्क मानला जातो. म्हणजेच लोकसंख्येची वाढ 2.1 च्या प्रजनन दराने स्थिर राहते. यापेक्षा कमी प्रजनन दर हे लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्याचे लक्षण आहे. 2019-20 या वर्षात केलेल्या सर्वेक्षणाचा डेटा NFHS-5 मध्ये गोळा करण्यात आला. या दरम्यान सुमारे 6.1 लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. NFHS-5 मध्ये यावेळी काही नवीन विषयांचा समावेश आहे जसे की प्री-स्कूलिंग, अपंगत्व, शौचालय सुविधा, मृत्यू नोंदणी, मासिक पाळीच्या दरम्यान आंघोळ आणि गर्भपाताच्या पद्धती आणि कारणे. 

Web Title: For the first time in the country, women outnumber men; Revealed in the National Family and Health Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.