नेताजींच्या आझाद हिंद सेनेचा पहिल्यांदाच सन्मान; नव्वदीपार चार सैनिक संचलनात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 11:37 AM2019-01-26T11:37:04+5:302019-01-26T15:04:28+5:30
आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांचे वय नव्वदी पार केलेले आहे.
नवी दिल्ली : नेताजींच्या आझाद हिंद सेनेने दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवत इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र, जपानवरील अणुबॉम्बहल्ल्यामुळे या सेनेची वाताहात झाली होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना कोणीच वाली राहिला नव्हता. त्यांची ही अवस्था देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही सुरुच राहिली होती. मात्र, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हयात असलेल्या चार सैनिकांना राजपथावर पथसंचनात सहभागी होण्याचा मान मिळाला.
आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांचे वय नव्वदी पार केलेले आहे. चंदीगढचे लालतीराम (98),गुरुग्रामचे परमानंद (99), हीरा सिंह (97) आणि भागमल (95) या सैनिकांनी आज परेडमध्ये सहभाग घेतला. आईएनएच्या सैनिकांना पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बोलावण्यात आले होते.
Delhi: Indian National Army veterans Bhagmal, Lalti Ram, Hira Singh and Parmanand Yadav took part in the #RepublicDay2019 parade today. pic.twitter.com/DjtcMtj3NJ
— ANI (@ANI) January 26, 2019
या सैनिकांना पथसंचलनावेळी उघड्या जीपमधून परेडमध्ये नेण्यात आले. हा क्षण भारतीय सैन्यदलासाठी अभिमानाचा असल्याचे मेजर जनरल राजपाल पूनिया यांनी सांगितले.