कोरोना लसींमुळे राजकीय पक्षाला ताप येतो, हे पहिल्यांदाच पाहिले - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:05 AM2021-09-19T11:05:22+5:302021-09-19T11:06:18+5:30
मोदी म्हणाले की, आतापर्यंत अनेक वाढदिवस आले व गेले, पण त्यापासून नेहमीच अलिप्त राहिलो. पण यंदाचा माझा वाढदिवस खूप वेगळा होता.
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही जणांना ताप येतो असे डॉक्टरांकडून ऐकले होते, पण शुक्रवारी कोरोना लसींचे अडीच कोटी डोस दिल्याचे ऐकून एका राजकीय पक्षालाच ताप आला हे पहिल्यांदाच पाहिले, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्या पक्षाला लगावला.
शनिवारी सकाळी गोव्यातील आरोग्यसेवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी एका आरोग्यसेवकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
मोदी म्हणाले की, आतापर्यंत अनेक वाढदिवस आले व गेले, पण त्यापासून नेहमीच अलिप्त राहिलो. पण यंदाचा माझा वाढदिवस खूप वेगळा होता.
इतर दिवशीही अडीच कोटी डोस द्या : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, देशात इतर दिवशीही अडीच कोटी डोस नागरिकांना मिळायला हवेत. त्या क्षणांची लोक वाट पाहत आहेत. माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले की, नागरिकांना मोठ्या संख्येने डोस देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचीच का वाट पाहिली गेली?