AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 09:05 AM2022-04-24T09:05:26+5:302022-04-24T09:05:50+5:30

विचार करा, जर बेडवर पडलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्याचवेळी डॉक्टर, नर्स किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाचे कर्मचारी संपावर जात असल्याचं सांगत असतील, तर काय परिस्थिती निर्माण होईल?

First Time In Delhi Aiims History Surgeries Postponed Even After Giving Anesthesia To The Patients As Nursing Staff Did Not Come Citing Awkward Reasons | AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

googlenewsNext

नवी दिल्ली-

विचार करा, जर बेडवर पडलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्याचवेळी डॉक्टर, नर्स किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाचे कर्मचारी संपावर जात असल्याचं सांगत असतील, तर काय परिस्थिती निर्माण होईल? ही निव्वळ काल्पनिक गोष्ट नाही. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) या देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. आता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या सुरक्षेबाबत किती चिंतित आहेत याचाही विचार करा. रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि रुग्णाच्या नातेवाइकांच्या आक्रमक वृत्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी कठोर कायद्याची मागणी करत असतात, पण एम्समध्ये जे घडले त्यावरून ते त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत खरोखर जागरूक आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

देशातील सर्वात मोठी आरोग्य संस्था एम्स आपल्या कार्यसंस्कृतीसाठी ओळखली जाते, परंतु शुक्रवारी संस्थेतील नर्सिंग स्टाफने अशी परिस्थिती निर्माण केली की ८० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या. शस्त्रक्रियेसाठी सर्व तयारी करण्यात आली होती, काही रुग्णांना भूलही देण्यात आली होती, परंतु नर्सिंग स्टाफने ऑपरेशन थिएटरमध्ये ड्युटी करण्यास नकार दिला, त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. रुग्णांना मानसिक छळ तर सहन करावा लागलाच पण त्यांचा जीवही धोक्यात आला होता. AIIMS प्रशासनानं केवळ नर्सिंग स्टाफला नोटीस बजावून उत्तर मागितलं नाही तर पोलिसांकडे एफआयआर देखील दाखल केला आहे. नर्सिंग स्टाफच्या या वागण्याने डॉक्टर, कर्मचारी आणि इतर काही नर्सिंग स्टाफही हैराण झाले असून, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेची तयारी पूर्ण झाली, मात्र कर्मचारी आले नाहीत
प्रकरण मेन एम्सच्या ओटीचं आहे. सध्या एम्समध्ये नर्सिंग युनियनची निवडणूक होणार आहे. वेगवेगळे गट आपापल्या नर्सिंग स्टाफच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. ऑपरेशन थिएटर तयार असताना ऑपरेशनमध्ये ड्युटीवर असलेले काही कर्मचारी ओटीपर्यंत पोहोचलेच नाहीत, असा प्रकार घडला. याबाबत ऑपरेशन थिएटरचे कर्तव्यदक्ष अधिकारी नर्सिंग स्टाफला समजावून सांगण्यासाठी गेले असता, त्यांनी रोस्टरबाबत आपल्या जुन्या मागण्यांचा हवाला देत कामावर न परतण्यावर ठाम राहिले. एवढेच नाही तर यादरम्यान काही नर्सिंग कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत शिवीगाळ सुरू केली. यासंदर्भातील एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

नर्सिंग स्टाफने मर्यादा ओलांडली, बोलतानाही गैरवर्तन केले
नर्सिंग स्टाफनं केलेल्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे गोष्टी पुढे आणखी खराब होत गेल्या आणि याचा परिणाम मुख्य एम्सच्या सर्व १२ ओटींवर झाला, ज्यात जवळपास ८० शस्त्रक्रिया नियोजित होत्या. एम्समध्ये शस्त्रक्रियेची तारीख वर्षभराहून अधिक बूक असते. तसे, एम्समध्ये, ओटीची तारीख मिळाल्यानंतरही रुग्णाला शस्त्रक्रिया करता येत नाही आणि त्यामुळे नर्सिंग स्टाफने ओटीमध्ये जाण्यास नकार दिला, हे एम्सच्या नावलौकिकाला शोभणारे नाही. 

एका ६२ वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितलं की, त्यांच्या रुग्णाला भूलही देण्यात आली होती, परंतु शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. अशा अनेक रुग्णांना या अवस्थेतून जावं लागलं आहे. एम्स प्रशासनानं वरिष्ठ नर्सिंग अधिकारी मानसी गर्ग यांना एम्सच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वतीनं नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे आणि यासाठी त्यांना २५ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्याचवेळी हे प्रकरण गांभीर्यानं घेत एम्स प्रशासनानं पोलिसात एफआयआरही दाखल केला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी नर्सिंग युनियनच्या अध्यक्षांशी अनेकवेळा संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

Web Title: First Time In Delhi Aiims History Surgeries Postponed Even After Giving Anesthesia To The Patients As Nursing Staff Did Not Come Citing Awkward Reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.