बापरे! देशात पहिल्यांदाच दिवसाला कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:56 AM2020-07-31T04:56:56+5:302020-07-31T04:57:16+5:30

एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजारांवर; १० लाखांहून अधिक जण झाले पूर्णपणे बरे

first time in India, more than 50,000 new corona patients in a single day | बापरे! देशात पहिल्यांदाच दिवसाला कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण

बापरे! देशात पहिल्यांदाच दिवसाला कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे.


देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून
अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.


कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन, त्यांची चाचणी व उपचार करणे ही नीती अवलंबल्यामुळेच देशातील मृत्यूदर कमी असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.


कोरोनाच्या १ कोटी ८१ लाखांहून अधिक चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या ४,४६,६४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या १,८१,९०,३८२ झाली.

Web Title: first time in India, more than 50,000 new corona patients in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.