काश्मीर सीमेवर प्रथमच महिला सैनिक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:07 AM2020-08-06T03:07:24+5:302020-08-06T03:08:11+5:30
या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांची प्रथमच सक्रिय ड्यूटीसाठी नियुक्ती करून सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यास दुजोरा देत एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येकी १० महिला सैनिकांच्या दोन तुकड्या गेल्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. महिलांची अंगझडती घेण्याचे कामही त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहेत.
परमनंट कमिशन देणार
गेल्या जानेवारीत लष्कराने ९९ महिला सैनिकांची भरती केली आहे; पण त्यांचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. दरम्यान, लष्करात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’वर सेवा देणाºया महिला अधिकाऱ्यांना ‘पर्मनंट कमिशन’ देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.