मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:34 AM2022-09-23T10:34:48+5:302022-09-23T10:50:05+5:30

विद्यार्थ्यांनी दिल्या भारतमाता की जय, वंदेमातरम् च्या घोषणा

First visit of Sarsangchalak Mohan Bhagwat to mosque-madrasah | मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

Next

शरद गुप्ता

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील एका मशिदीत जाऊन ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (एआयआयओ) प्रमुख उमर अहमद इल्यासी यांची भेट घेतली. त्यानंतर भागवत यांनी एका मदरशाला भेट दिली. भागवत यांनी पहिल्यांदाच कोणत्याही मशीद व मदरशाला भेट दिली आहे. त्याप्रसंगी मदरशातील विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय, वंदेमातरम् च्या घोषणा दिल्या.
भागवत यांच्याबरोबर रा. स्व. संघाचे सरचिटणीस कृष्ण गोपाल, रामलाल, इंद्रेशकुमार होते. 

भागवत हे ‘राष्ट्रपिता’ :  इल्यासी
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला; पण त्यावर तत्काळ भागवत म्हणाले की, या देशात फक्त एकच राष्ट्रपिता आहेत, त्यांच्याशिवाय अन्य कोणीही नाही. आपण सारे भारताची लेकरे आहोत.

 

Web Title: First visit of Sarsangchalak Mohan Bhagwat to mosque-madrasah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.