पहिल्या पत्नीची माहिती लपवून केला दुसरीशी विवाह फसवणूक : फौजदारासह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल
By Admin | Published: August 10, 2016 11:22 PM2016-08-10T23:22:00+5:302016-08-10T23:22:00+5:30
जळगाव: पहिल्या पत्नीबाबत माहिती लपवून दुसरीशी लग्न केले तसेच दोन लाख रुपये रोख व कॉट, कपाटसाठी छळ केल्याप्रकरणी स्वप्निल चांगदेव पाटील (पती), कमलाबाई चांगदेव पाटील (सासु), दिनेश चांगदेव पाटील (जेठ),पल्लवी देवेंद्र कोळी (नणंद) रा.वाघ नगर, जळगाव, सविता राजेंद्र इंगळे (नणंद), सहायक पोलीस निरीक्षक निवृत्ती रामदास तायडे (मामसासरे), सुमनबाई निवृत्ती तायडे (मामसासू), नीलेश निवृत्ती तायडे व शिल्पा निवृत्ती तायडे ( ह.मु.कळंबोली, ठाणे) या सात जणांविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक व मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चांगदेव पाटील हे मयत आहेत.
ज गाव: पहिल्या पत्नीबाबत माहिती लपवून दुसरीशी लग्न केले तसेच दोन लाख रुपये रोख व कॉट, कपाटसाठी छळ केल्याप्रकरणी स्वप्निल चांगदेव पाटील (पती), कमलाबाई चांगदेव पाटील (सासु), दिनेश चांगदेव पाटील (जेठ),पल्लवी देवेंद्र कोळी (नणंद) रा.वाघ नगर, जळगाव, सविता राजेंद्र इंगळे (नणंद), सहायक पोलीस निरीक्षक निवृत्ती रामदास तायडे (मामसासरे), सुमनबाई निवृत्ती तायडे (मामसासू), नीलेश निवृत्ती तायडे व शिल्पा निवृत्ती तायडे ( ह.मु.कळंबोली, ठाणे) या सात जणांविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक व मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चांगदेव पाटील हे मयत आहेत.ममता स्वप्नील पाटील (वय २१,रा.वाघ नगर, ह.मु.फैजपूर) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील व ममता यांचा २७ जून २०१५ रोजी जळगाव येथे विवाह झाला होता.या विवाहाच्या आधी स्वप्नील याचे एका तरुणीशी लग्न झाले होते. त्याची नोटरी फारकत झाली होती. त्याचे कागदपत्र ममता यांना सापडले होते. दरम्यान, ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. ममता व त्यांच्या आई वडिलांवरही खोटा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, फसवणूक व छळाची तक्रार घेण्यास तालुका पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ममता व त्यांच्या परिवाराने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. नंतर त्यांच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील निवृत्ती तायडे हे ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक आहेत.ठाणे अमलदाराने फेकला अंगावर कागददरम्यान, त्यातही फिर्यादीत दिलेल्या दोन नावांचा समावेश न केल्याने त्याचा जाब विचारला असता ठाणे अमलदाराने वाद घालून फिर्यादीचा कागद फाडून अंगावर फेकून दिला होता.त्याची तक्रार ममता पाटील यांनी सुपेकर यांच्याकडे केली असता त्यांनी पोलीस निरीक्षकाची खरडपी काढून फिर्यादीची सविस्तर तक्रार घेण्याचे आदेश दिले.