आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 10:16 AM2017-09-19T10:16:38+5:302017-09-19T10:31:50+5:30

आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे.

First you eat meat after eating meat - Maneka Gandhi's statement | आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

आधी तुम्ही मांस खाता नंतर मांस तुम्हाला खातं- मनेका गांधींचं वक्तव्य

Next
ठळक मुद्देआधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंका जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, दि. 19- आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधीं यांनी केलं आहे. मनेका गांधी यांनी हे वक्तव्य करत शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या माध्यमातून मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचं मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासाला आकडेवारीचाही आधार आहे,’ असं मनेका गांधीं यांनी या कार्यक्रमात म्हटलं. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केला, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. पण त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यासगळ्यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असं म्हणत मनेका गांधीं यांनी शाकाहाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. द इव्हिडन्स-मीट किल्स या सिनेमाच्या निर्मितीमागील उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणं असल्याचं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावं, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं.

मुलं जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असं म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या शिक्षणाच्या काळात डॉक्टर कसं व्हावं हे शिकवलं जातं. पण आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवाल मनेका गांधी यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला आहे.
 

Web Title: First you eat meat after eating meat - Maneka Gandhi's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.