नोटमंदी: कुठून काढली जास्त कॅश? होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 04:22 PM2018-04-21T16:22:56+5:302018-04-21T16:22:56+5:30
एटीएममध्ये कॅशची चणचण असल्याने केंद्र सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जातीये
नवी दिल्ली- एटीएममध्ये कॅशची चणचण असल्याने केंद्र सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जातीये. एटीएममधील पैशांची चणचण दूर करण्याबरोबरच पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही यासाठीही केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आता रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्व प्रादेशिक कार्यलयातून दर महिन्याला एटीएममधून कॅशची मागणी व सप्लायची चाचपणी करणार आहे.
याशिवाय फायनान्शिअल इंटेलिजन्स यूनिट (एफआययू) जवळपास 2166 एटीएम सेंटरची तपासणी करणार आहे. गेल्या काही दिवसात जास्त पैसे काढलेले हे एटीएम आहेत. त्यांचीच आता तपासणी केली जाणार आहे. तसंच ज्या लोकांनी या एटीएममधून जास्त पैसे काढले,त्यांचीशी माहिती घेतली जाणार आहे.
या तपासत आयकर विभागही एफआययूची मदत करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पैशांची मागणी वाढली हे खरं असलं तरी एटीएममध्ये पैशांची चणचण निर्माण व्हावी, यासाठी खेळ खेळला गेला असवा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. म्हणूनच कुठून जास्त पैसे काढले गेले ?याबद्दलचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे.