औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:12 AM2018-04-08T00:12:15+5:302018-04-08T00:12:15+5:30
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.
प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळासाठी स्टेटमेंट आॅफ वर्क (एसओडब्ल्यू) जारी केले असून, या विमानतळावर विकास कामे करण्यात येणार आहेत. पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगसाठी व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनेक विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यात रनवेचा विस्तार अन्य विकास कामांचा समावेश आहे.
औरंगाबाद विमानतळाच्या रनवेचा २८३५ मीटरवरून ३६६० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, तर अकोला विमानतळाच्या रनवेचा १२१९ मीटरवरून १४०० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचे ब्लॉक कम कंट्रोल टॉवर, ई अँड एम वर्कशॉप, अग्निशमन दल व संबंधित इमारती यांचा या यांता समावेश आहे.
अन्य सोयी या असतील
जळगाव विमातळाच्या रनवेचा सध्या १७०० मीटरचा असून, तो ३२६९ मीटर करण्यात येईल. कोल्हापूर विमानळाच्या रनवेचा १३७० मीटरवरुन २३०० मीटरपर्यंत विस्तार केला जाईल. याशिवाय नवी टर्मिनल इमारत, एटीसी कम टेक्निकल ब्लॉक कम फायर स्टेशन, डीव्हीओआर, रात्रीच्या लँडिंगची सुविधा आणि रनवेच्या दोन्ही टोकास साधी सुलभ प्रकाश योजना यांचा समावेश आहे. पुणे विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग, एअरबस ३२०/३२१ विमानांसाठी पािर्कंग आदी सुविधांचा समावेश आहे.