संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 07:45 AM2023-09-01T07:45:07+5:302023-09-01T07:45:17+5:30
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. मोदी सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात केलेल्या कामगिरीवरील प्रस्तावही पारित केले जाणार आहेत.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावण्यात आले आहे. यात चंद्रयान-३, जी-२० संमेलनाचे आयोजन, आर्थिक शक्ती बनण्यासारख्या कामगिरीवर प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात १० विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. मोदी सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात केलेल्या कामगिरीवरील प्रस्तावही पारित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे १९ सप्टेंबरपासून गणपती उत्सव सुरू होत आहे. यावरून विरोधी पक्षांनी टीकाही केली आहे.
नव्या संसदेत विशेष अधिवेशन?
- नवीन संसद भवन आता पूर्णपणे तयार झाले आहे.
- संसदेचे विशेष अधिवेशन नव्या संसद भवनात होऊ शकते. याबाबतचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला लवकरच घेणार आहेत.
- पावसाळी अधिवेशनावेळी नवे संसद तयार नसल्याने जुन्या संसद भवनात अधिवेशन घेण्यात आले होते.
- नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी केले.