...आणि पाण्याच्या पाइपातून पडू लागल्या पाचशेच्या नोटा! कनिष्ठ अभियंत्याची मालमत्ता पाहून पोलीसही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 07:25 AM2021-11-25T07:25:23+5:302021-11-25T07:27:08+5:30
अबब...! केवढी ही संपत्ती... पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले...; दोन मोठे बंगले बांधले, ३५ एकर जमीन विकत घेतली. मोठे फार्म हाऊस बांधले. अन्य मालमत्तांची मोजदाद सुरू...
कलबुर्गी : सरकारी नोकरीत काही काळाने पदोन्नती मिळतेच. पण काही जण पदोन्नती, बदली नको, म्हणून प्रयत्न करतात, पदोन्नतीमुळे आपल्यावर इतरांचे लक्ष राहते. जादा काम करावे लागते. ते बऱ्याच जणांना नको असते. कर्नाटकात सार्वजनिक बांधकाम खात्यात ३० वर्षे कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या शांतनगौडा बिरादरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा घातला, तेव्हा करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती व मालमत्ता आढळली.
अबब...! केवढी ही संपत्ती...
दोन मोठे बंगले बांधले, ३५ एकर जमीन विकत घेतली. मोठे फार्म हाऊस बांधले. अन्य मालमत्तांची मोजदाद सुरू...
पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले...
- बिरादरने घरात लपवलेले पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले. त्यांना ४० लाख तर सहज सापडले.
- त्याने १३ लाख रुपयांची रोकड तर भिंतीच्या पाइपात लपवली होती. आतमध्ये पाणी नव्हे तर नोटाच भरल्या होत्या. पाइप फोडताच नोटाच खाली पडू लागल्या.
- पाइप उघडण्यासाठी पोलिसांनी प्लंबरलाच बोलावून आणले होते. शांतनगौडा बिरादरने ३० वर्षांत दोनच जिल्ह्यांत काम केले.