पाचशेच्या दोन प्रकारच्या नोटा सरकारने छापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:40 AM2017-08-09T01:40:40+5:302017-08-09T01:40:53+5:30

देशात ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा छापल्या जात आहेत. एक सत्ताधारी भाजपला निवडणुकांमधे वापरण्यासाठी तर दुसऱ्या देशातल्या जनतेसाठी. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला, त्याचे सत्य आज आम्हाला कळाले आहे.

Five hundred types of notes were printed by the government | पाचशेच्या दोन प्रकारच्या नोटा सरकारने छापल्या

पाचशेच्या दोन प्रकारच्या नोटा सरकारने छापल्या

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली :देशात ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा छापल्या जात आहेत. एक सत्ताधारी भाजपला निवडणुकांमधे वापरण्यासाठी तर दुसºया देशातल्या जनतेसाठी. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला, त्याचे सत्य आज आम्हाला कळाले आहे. असा आरोप काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात हरकतीचा मुद्द्याद्वारे केला आणि दोन प्रकारच्या नोटांची रंगीत फोटाकॉपी सभागृहात फडकावली.
सभागृहाचे नेते अर्थमंत्री अरूण जेटलींनी हा शून्य प्रहराचा दुरूपयोग आहे. कुठले तरी कागद हवेत फडकावत सभागृहात हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याची कायद्यात तरतूद नाही असे सांगत सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला. मात्र काँग्रेससह बहुतांश विरोधकांनी दोन प्रकारच्या नोटांवर गंभीर आक्षेप नोंदवला. सिब्बल यांच्या आरोपांना दुजोरा देत जद(यु)चे शरद यादव, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन यांनीही जाब विचारला. काँग्रेस सदस्यांचा मुख्य आरोप होता की ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटांची छपाई हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आनंद शर्मा म्हणाले की, चलनव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले, दोन प्रकारच्या नोटा हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही. चर्चा हवी असल्यास त्यांनी रितसर नोटीस द्यावी. उपसभापतींच्या निर्णयाशी असहमत होत घोषणा देत विरोधक आसनासमोर आले. या गदारोळात शून्य प्रहरात दोनदा व प्रश्नोत्तराच्या तासात तीनदा कामकाज तहकूब झाले.

आक्षेपांचे उत्तर नाहीच

विरोधकांच्या आरोपांचे खंडन करीत काहीशा संतापलेल्या स्वरात जेटली म्हणाले की, विरोधक नेहमीच नोटीस न देता बिनमहत्त्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित करतात. शून्य प्रहराचा हा सरळ सरळ दुरूपयोग आहे. मात्र, नोटांविषयीच्या विरोधकांच्या आक्षेपांबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

Web Title: Five hundred types of notes were printed by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.