घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:44 AM2023-10-27T10:44:00+5:302023-10-27T10:45:31+5:30

जवानांनी काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्याची  पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

five infiltrators killed second incident in five days in jammu kashmir | घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना

घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते, तर उर्वरित दोघांची ओळख पटलेली नाही. 

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले. जवानांनी काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्याची  पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

गोळ्या येताच केला तुफान मारा...

पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी माछिल सेक्टरमध्ये शोधमोहीम सुरू केली. तेव्हा त्यांना काहीजण भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. सुरक्षा दलांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले.


 

Web Title: five infiltrators killed second incident in five days in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.