देशभरात पोलिसांच्या पाच लाख जागा रिक्त

By Admin | Published: January 16, 2017 04:58 AM2017-01-16T04:58:36+5:302017-01-16T04:58:36+5:30

संपूर्ण देशात पोलीस दलासाठी २२.६३ लाख जागांना मंजुरी असून त्यापैकी पाच लाख जागा रिक्त आहेत.

Five lakh vacancies of police across the country are vacant | देशभरात पोलिसांच्या पाच लाख जागा रिक्त

देशभरात पोलिसांच्या पाच लाख जागा रिक्त

googlenewsNext


नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलीस दलासाठी २२.६३ लाख जागांना मंजुरी असून त्यापैकी पाच लाख जागा रिक्त आहेत. पोलीस दलांसाठी २२ लाख ६३ हजार २२२ जागा भरण्यास मंजुरी आहे. त्यापैकी १७ लाख ६१ हजार २०० जागा भरलेल्या आहेत.
सर्वात जास्त जागा (१.८० लाख) उत्तर प्रदेशात रिक्त आहेत. तेथे ३ लाख ६४ हजार २०० क्षमतेचे पोलीस दल आहे. पश्चिम बंगालमध्ये १ लाख ११ हजार १७६ जागांना मंजुरी असून तेथे ३५ हजार जागा भरायच्या आहेत. बिहारमध्ये एक लाख १२ हजार ५५४ जागा मंजूर असून सुमारे ३० हजार ३०० जागा रिक्त आहेत. कर्नाटकात एक लाख ७ हजार ५३ जागा मंजूर असून तेथे सुमारे २५ हजार ५०० जागा रिक्त आहेत. गुजरातेत ९९ हजार ४२३ जागा मंजूर असून सुमारे १७ हजार २०० रिक्त आहेत. तामिळनाडूत एक लाख ३५ हजार ८३० जागा असून १६ हजार ७०० जागा भरायच्या आहेत. छत्तीसगढमध्ये ६८ हजार ९९ जागा मंजूर असून तेथे ८ हजार ५०० जागा रिक्त आहेत. एकूण १५ हजार ५५५ पोलीस ठाणी असून त्यातील १० हजार १४ ठाणी ग्रामीण भागात तर उर्वरीत नागरी भागात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>188 पोलीस ठाण्यांना वाहन नाही.
>402 पोलीस ठाण्यांना दूरध्वनी नाही.
>134पोलीस ठाण्यांनावायरलेस संच नाही

Web Title: Five lakh vacancies of police across the country are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.