पाच लिटर पाण्याची होणार बचत- जोड
By Admin | Published: March 21, 2016 12:21 AM2016-03-21T00:21:39+5:302016-03-21T00:21:39+5:30
यंदा कूपनलिका दुरुस्ती...
य दा कूपनलिका दुरुस्ती...दरवर्षी एल.के. फाउंडेशनच्यावतीने महाबळ रस्त्यावर धुलिवंदन सणाचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येते. दोन वर्षांपासून एल.के. फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन मिळून हा उत्सव साजरे करू लागले होते. हजारो तरुणांना एकाच ठिकाणी रंग उधळण्याची पर्वणी उपलब्ध करून देणार्या दोन्ही फाउंडेशनच्यावतीने महाबळ रस्त्यावर रेन डान्स, समुद्राचा आभास व इतर प्रकार उपलब्ध करुन दिले जात असत. विशेष म्हणजे यामध्ये मुले व मुलांची स्वतंत्र व्यवस्था राहत असे. मात्र यंदा या गोष्टींना फाटा देत एल.के. फाउंडेशनच्यावतीने होळी साजरी न करता त्या खर्चामध्ये मनपाच्या नादुरुस्त व ज्यांची खोली कमी आहे, अशा कुपनलिकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील दीड लाख लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. इन्फो...नगरसेवकांनीही दुष्काळग्रस्तांना मदत करावी...दरवर्षी धुलिवंदनसाठी नगरसेवकांकडून पाण्याचे टँकर मिळत होते. यंदाही नगरसेवकांनी हे टँकर द्यावे मात्र ते धुलिवंदनसाठी न देता दुष्काळग्रस्तांना मदतसाठी द्यावे, त्या टँकरला लागणार्या डिझेलचा व चालकाचा खर्च युवाशक्ती फाउंडेशन करेल, अशी ग्वाही अध्यक्ष विराज कावडिया यांनी देऊन नगरसेवकांनाही दुष्काळी स्थितीत मदतीसाठी सरसावण्याचे आवाहन केले आहे. इन्फो...यात्रेसाठी टँकर...धुलिवंदनला जे पाणी लागणार होते, ते वाचवून गरजूंना मिळावे म्हणून नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाच्यावतीने एक टँकर धामणगाव यात्रेला पाठवूनही दिले आहे. एकूण चार टँकर दुष्काळी भागात दिले जाणार असून आता उर्वरित तीन टँकर एप्रिल-मे महिन्यात दुष्काळाची दाहकता वाढेल त्यावेळी दुष्काळी गावात दिले जातील, असे मंडळाने ठरविले आहे.