छत्तीसगडमधील चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:47 AM2019-08-24T11:47:36+5:302019-08-24T11:51:28+5:30
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली आहे. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी (24 ऑगस्ट) चकमक झाली आहे. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
#UPDATE Five Maoists have been killed in encounter with security forces in Narayanpur,Chhattisgarh https://t.co/a7hbBZ4Ei7
— ANI (@ANI) August 24, 2019
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली होती. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले होते.