पाकच्या पाच सैनिकांना कंठस्नान

By admin | Published: June 2, 2017 04:00 AM2017-06-02T04:00:53+5:302017-06-02T04:00:53+5:30

भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुुरुवारी पाकचे पाच सैनिक ठार, तर सहा जखमी झाले

Five Pak soldiers killed | पाकच्या पाच सैनिकांना कंठस्नान

पाकच्या पाच सैनिकांना कंठस्नान

Next

जम्मू /श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुुरुवारी पाकचे पाच सैनिक ठार, तर सहा जखमी झाले. तत्पूर्वी पहाटे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात गोळीबार केला होता. भारतीय सुरक्षा
दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना गुरुवारी ठार मारले. ते दोघे स्थानिक होते.

रावत यांनी घेतला आढावा

काश्मीर आणि नियंत्रण रेषेवर तैनात सुरक्षा दलांची सज्जता आणि एकूण सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपीन रावत गुरुवारी येथे दाखल झाले. खोऱ्यातील सुरक्षा स्थिती आणि लष्करी सज्जतेचा आढावा घेणे हा रावत यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे.
हिजबुलचा कमांडर सबझार भट मारला गेल्यानंतर काश्मिरात तणाव कायम आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आली.

Web Title: Five Pak soldiers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.