मोठी बातमी! लंडनहून दिल्लीला आलेले ५ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह
By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 11:49 AM2020-12-22T11:49:25+5:302020-12-22T11:49:54+5:30
एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती
नवी दिल्ली
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने लंडनमध्ये धुमाकूळ घातलेला असताना सोमवारी रात्री लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.
Five out of 266 passengers & crew members of a flight which arrived at Delhi airport from London last night have tested positive for COVID-19. Their samples have been sent to NCDC for research & they have been sent to care centre: Nodal officer for COVID-19
— ANI (@ANI) December 22, 2020
भारतानेही ब्रिटनमधील भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लंडनमधून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. पण सोमवारी रात्री लंडनहून शेवटची ५ विमानं भारतात आली आहेत. यातील दिल्ली विमानतळावर उतरलेल्या विमानातील प्रवाशांपैकी ५ प्रवासी आता कोरोना संक्रमिक आढळले आहेत.