पाकिस्तानच्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 12:30 AM2018-05-19T00:30:08+5:302018-05-19T00:30:08+5:30
आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागांत शुक्रवारी पहाटेपासून पाकिस्तानी सैन्याने लष्करी चौक्या व नागरी वस्त्यांवर केलेल्या तोफगोळ््यांच्या माऱ्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आणि चार रहिवासी मरण पावले.
जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागांत शुक्रवारी पहाटेपासून पाकिस्तानी सैन्याने लष्करी चौक्या व नागरी वस्त्यांवर केलेल्या तोफगोळ््यांच्या माऱ्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आणि चार रहिवासी मरण पावले. त्यात एका दांपत्याचाही समावेश आहे. इतर १२ जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवारी काश्मिरात येत असून त्याआधी पाकिस्तानने ही आगळीक केली आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव सीताराम उपाध्याय (२८) असे असून तो झारखंडचा रहिवासी आहे. जम्मूतील अर्निया व आरएस पुरा यासीमेलगतच्या भागांमध्ये पाकने केलेल्या तोफगोळ््यांच्या माºयात चार रहिवासी मरण पावले. या हल्ल्यांबद्दल मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचा निषेध केला आहे. रमझानकाळात सीमेवर शांतता राहावी यासाठी भारताने पुढाकार घेतला. पण पाकला त्याचे सोयरसुतक नाही असे त्या म्हणाल्या. आहे.
मेहबुबा प्रशासनात अनेक त्रुटी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली. श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री एका पोलिसाकडून दहशतवाद्यांनी तीन रायफल हिसकावून घेतल्या व ते पळून गेले. याचा उल्लेख अब्दुल्ला केला. (वृत्तसंस्था)
>चोराच्या उलट्या बोंबा
स्वत: भारतीय भागांत गोळीबार व तोफांचा मारा करणाºया पाकिस्तानने भारतावरच हल्लाचा आरोप केला आहे. भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसरिया यांना पाकच्या परराष्ट्र सचिवांनी बोलावून घेतले आणि भारतीय लष्कर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा केला. भारतीय लष्कराच्या माºयामुळे खनूर गावात एका कुटुंबातील चार जण मरण पावल्याचा व १० जण जखमी झाल्याचा दावा पाकने केला आहे.