मध्य प्रदेशात पोलिसांकडून शेतक-यांवर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू
By admin | Published: June 6, 2017 03:37 PM2017-06-06T15:37:32+5:302017-06-06T18:18:37+5:30
मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
मंदसौर, दि. 06 - मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून बसेसची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, मध्यप्रदेशातील मंदसौर, रतलाम आणि उज्जैनमधील शेतक-यांचे आंदोलन पाहता, या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय किसान मजदूर संघाकडून उद्या बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला नाही. गोळीबाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, सरकारकडून कोणतीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली नाही किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले होते. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण आल्याने संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सगल पाच वर्षे केंद्र सरकारकडून कृषी कर्मण पुरस्कार मिळविणा-या मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, अद्याप या शेतक-यांच्या मागण्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या नसून शेतकरी सुद्धा आपल्या मागण्यावर ठाम असून आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
#UPDATE Madhya Pradesh: Death toll rises to five in firing that took place during Mandsaur farmers" protest
— ANI (@ANI_news) June 6, 2017
#UPDATE Mandsaur farmers" protest (MP): Death toll rises to three, curfew imposed in sensitive areas
— ANI (@ANI_news) June 6, 2017
Madhya Pradesh: 2 farmers dead, 4 injured in firing that took place in Mandsaur during farmers" protest. pic.twitter.com/4HNPtksUBi
— ANI (@ANI_news) June 6, 2017