पाकच्या तोफमाऱ्यात एकाच कुटुंबातील पाच जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:58 AM2018-03-19T01:58:33+5:302018-03-19T01:58:33+5:30
पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमेवरील खेड्यांत रविवारी केलेल्या उखळी तोफांच्या मा-यात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन भावांसह पाच जण ठार झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमेवरील खेड्यांत रविवारी केलेल्या उखळी तोफांच्या मा-यात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन भावांसह पाच जण ठार झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. माºयात दोन बहिणीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी जम्मुला विमानाने हलवण्यात आले आहे.
पाक सैन्याने नियंत्रण रेषेपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील नागरी भागांमध्ये सकाळी शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करीत जवळपास चार तास तोफांचा मारा केला.
सीमेवर असलेल्या भारतीय जवानांनी या माºयाला चोख प्रतिउत्तर दिल्याची माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले.
मृतांमध्ये रमझान, त्यांची
पत्नी मलिका बी (३२), मुले अब्दुल रेहमान (१४), मोहम्मद रिझवान (१२) आणि रझाक रमझान (७) यांचा समावेश आहे. रमझान यांच्या दोन मुली नसरीन कौसर (११) आणि माहरीन कौसर (५) या गंभीर जखमी झाल्या आहेत.