जामनेरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार राज्यातून पाच जणांचा समावेश
By admin | Published: July 23, 2016 12:03 AM2016-07-23T00:03:07+5:302016-07-23T00:03:07+5:30
जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.
Next
ज गाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.राज्यातून पाच जणांची निवडभारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार्या सत्कार कार्यक्रमासाठी राज्यातून पाच जणांची निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ सखाराम माळी (रा.गणेशवाडी, जामनेर), महिपत याकूब शेख (रा. शाहूपुरी,सातारा), नागेश विठ्ठल साळगावकर (रा.सिद्धार्थनगर, गोरेगाव प., मुंबई), शेषराव आत्माराम बडवाईक (रा.नागपूर), कृष्णराव नरहरराव देशपांडे (रा.देगलूर, नांदेड) यांचा समावेश आहे. या स्वातंत्र्य सैनिकांसोबत त्यांच्या एका प्रतिनिधीला दिल्ली येथे जाता येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक शासनाचे विशेष अतिथीसत्कारासाठी निवड झालेले सर्व स्वातंत्र्य सैनिक हे शासनाचे विशेष अतिथी असल्याने नवी दिल्लीकडे प्रयाणाच्या व परतण्याच्या दिवशी निवासस्थानापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत वाहनाची व्यवस्था तसेच संपर्क अधिकार्याची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहे.