भाजपचे ‘आप’ला दररोज पाच प्रश्न
By admin | Published: January 31, 2015 02:00 AM2015-01-31T02:00:19+5:302015-01-31T02:00:19+5:30
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वत: दिल्लीत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभळली असून स्थानिक नेत्यांसोबतच शंभरापेक्षा जास्त खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचाराच्या कामी लावले आहे.
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वत: दिल्लीत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभळली असून स्थानिक नेत्यांसोबतच शंभरापेक्षा जास्त खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचाराच्या कामी लावले आहे.
दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन प्रचारसभांना संबोधित केले आहे. भाजपाने दररोज ‘आप’ला पाच प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला आहे. ‘आप’ हा पक्ष महिलाविरोधी असून निधी आणि देणग्यांबाबत माहिती लपवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> असे आहेत भाजपचे पाच प्रश्न...!
१) ‘आप’ला विदेशातून निधी कसा मिळत आहे? २) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चाची माहिती निवडणूक आयोगाला का दिली नाही? ३) महिलांनी आपमधून बाहेर पडणे का चालविले आहे? ४) ‘आप’ संवैधानिक संस्थांचा आदर का करीत नाही? ५) लोकायुक्तांच्या मुद्यावर या पक्षाने जनतेची दिशाभूल का केली?