जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या लुटल्या 5 रायफल्स

By admin | Published: May 3, 2017 07:58 AM2017-05-03T07:58:44+5:302017-05-03T11:25:56+5:30

जम्मू काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करत त्यांच्याकडील 5 रायफल्स लुटल्या आहेत.

Five Rifles Looted by Police in Jammu | जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या लुटल्या 5 रायफल्स

जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या लुटल्या 5 रायफल्स

Next

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 3 -  जम्मू काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करत त्यांच्याकडील 5 रायफल्स लुटल्या आहेत. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोर्ट परिसरात पोलीस पोस्टवर हल्ला केला व तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांकडून 5 रायफल्या लुटल्या. दक्षिण काश्मीरमधील शोपिया येथील जिल्हा कोर्ट परिसरात ही घटना आहे. 
 
दरम्यान, ज्या 5 पोलीस कर्मचा-यांकडील रायफल दहशतवादी घेऊन फरार झाले आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्य जबाबदारीनं न बजावल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाय, जेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्याकडील रायफल्स लुटल्या त्यावेळी संबंधित पोलीस कर्मचा-यांनी कोणत्याही प्रकारे त्यांना विरोध केला आहे, असाही आरोप निलंबित पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. 
 
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 
 
बँकेच्या कॅशव्हॅनवर हल्ला, ५ पोलिसांसह ७ ठार
सोमवारी (1 मे) जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. अतिरेक्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी  हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली आहे.
 
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक केली जात असताना अतिरेकी घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी कॅश व्हॅनवरील हल्ल्याच्या निमित्ताने पोलीस दलाला लक्ष्य बनविण्याची घटना घडली.  दरम्यान, अतिरेक्यांना पकडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाने शोधमोहीम चालवली आहे. तत्पूर्वी रविवारी श्रीनगरच्या खानयार  पोलीस ठाण्यावर हल्लेखोरांनी ग्रेनेडचा मारा केला. त्यात चार पोलीस जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.
 
दहशतवाद्यांनी पुन्हा लुटली बँक 
तर मंगळवारी (2 मे) कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटल्याची घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. 
 

Web Title: Five Rifles Looted by Police in Jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.