एकाचवेळी आढळले पाच फुरसे सर्प

By admin | Published: March 17, 2016 12:53 AM2016-03-17T00:53:39+5:302016-03-17T00:53:39+5:30

जळगाव : रायपूर गावात घराचे बांधकाम करीत असताना एकाच वेळी पाच विषारी फुरसे जातीचे सर्प आढळल्याची नोंद पहिल्यांदाच वन्यजिव संरक्षण संस्थेत झाली असल्याचे सर्पमीत्र वासुदेव वाढे यांनी सांगितले.

Five snows found at the same time | एकाचवेळी आढळले पाच फुरसे सर्प

एकाचवेळी आढळले पाच फुरसे सर्प

Next
गाव : रायपूर गावात घराचे बांधकाम करीत असताना एकाच वेळी पाच विषारी फुरसे जातीचे सर्प आढळल्याची नोंद पहिल्यांदाच वन्यजिव संरक्षण संस्थेत झाली असल्याचे सर्पमीत्र वासुदेव वाढे यांनी सांगितले.
रायपुर गावात घराचे बांधकाम सुरू असताना मजुरांना मुरूमाच्या दगडाखाली सर्प दिसला. मजुर सर्पाला मारण्याच्या तयारीत असताना वासुदेव वाढे यांनी घटनास्थळ गाठत त्या सर्पाला वाचविले. मात्र त्याच वेळी एकापाठोपाठ पाच सर्प आढळून आले. वाढे यांनी सर्पांना शिताफिने पकडून सुरक्षित ठिकाणी मुक्त केले.
वाढे यांनी माहिती गोळा केली असता, याअगोदर एकाच वेळी पाच फुरसे सर्प आढळल्याची नोंद नसल्याचे आढळून आले.
असे आहे वर्णन
हा सर्प अती विषारी असून कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतो. तर महाराष्ट्रात कमी प्रमाणात आढळतो. भुरसट रंगाचा असून अंगावर वेडेवाकडे प˜े असतात. सरासरी लांबी दीड फुट व डोक्यावर त्रिकोणी बाणाची खूण असते. तसेच लालसर रंगाची जीभ असते.

Web Title: Five snows found at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.